महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुणीवर अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या युवा प्रदेशाध्यक्षावर महिला आयोगाने केली कारवाईची मागणी - औरंगाबाद राष्ट्रवादी युवा प्रदेशाध्यक्ष अत्याचार गुन्हा

एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या युवा प्रदेशाध्यक्षवर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर याच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.

Women Commission
महिला आयोग

By

Published : Jan 8, 2021, 7:34 AM IST

औरंगाबाद - राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याने एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना समोर आली. यामुळे सत्तारूढ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली.

जिवे मारण्याची धमकी तरी कारवाई नाही -

शिक्षक तरुणीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गंभीर आहे. महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊन तेरा दिवस उलटले आहेत तरीही आरोपी मोकाट आहे. आरोपीपासून पीडितेला धोका आहे. पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली. यामुळे विजया राहटकर यांनी संताप व्यक्त केला.

काय आहे प्रकरण -

दोन महिन्यांपूर्वी बीड बायपास रोडवर ट्यूशन चालू करण्यासाठी पीडित भाड्याने रुम शोधत होती. त्यावेळी तिची मेहबुब शेख यांच्याशी ओळख झाली होती. यादरम्यान मेहबुब शेख यांनी शिक्षणाबाबत विचारपूसकरून तुला मुंबईत चांगल्या ठिकाणी नोकरी लावून देतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर पीडित तरुणी आणि शेख यांची दोन ते तीनवेळा भेट झाली. त्यानंतर नोकरी लावण्यासाठी मुंबईला जायचे आहे, असे म्हणत 14 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री नऊच्या सुमारास शेख यांनी जालना रोडवरील रामगिरी हॉटेलसमोर तिला बोलावून घेतले. शेखने पीडित तरुणीला कारमध्ये बसवून वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बाजूला नेले. तेथे कार उभी करुन कारमध्येच त्यांनी जबरदस्ती केली. तिला जीवे मारण्याची धमकीही दिली, अशी तक्रार पीडितेने पोलीस ठाण्यात दिली होती.

'कथनी आणि करनी'मधील फरक -

एकीकडे राज्य सरकारने महिला अत्याचार रोखण्यासाठी 'शक्ती' विधेयक विधिमंडळात मांडले आहे. त्यात काही कठोर तरतुदींचा समावेश आहे. पण दुसरीकडे, हे विधेयक मांडणाऱ्या गृहखात्यातूनच बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय बळकट होत आहे. 'कथनी आणि करनी'मधील हा फरक राज्य सरकारच्या व गृह खात्याच्या महिला अत्याचार रोखण्याबाबतच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी विजया राहटकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details