महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद रेल्वेस्थानकावर छेड काढणाऱ्या तरुणास महिलेने चपलेने बदडले - औरंगाबाद

लासुर भागात चालत्या रेल्वे मध्ये एका तरुणीची काही तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेला आठवडा ही उलटत नाही तोच पुन्हा औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर थांबलेल्या एका महिलेची छेड काढण्यात आली आहे.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज

By

Published : May 15, 2019, 11:21 PM IST

औरंगाबाद-रेल्वे स्थानकावर महिलेला अश्लील शेरेबाजी करीत पाठलाग करून धक्का मारणाऱ्या तरुणाला महिलेने चपलेने चांगलाच चोप दिला. यानंतर नागरिकांनी त्या तरुणास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एक वर घडली. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज

लासुर भागात चालत्या रेल्वेमध्ये एका तरुणीची काही तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेला आठवडाही उलटत नाही तोच पुन्हा औरंगाबाद रेल्वेस्थानकात एका महिलेची छेड काढण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान एक महिला रेल्वेची वाट पाहत थांबली असता तेथे आलेल्या एका तरुणाने महिलेला अश्लील शेरेबाजी करण्यास सुरुवात केली. तेथून महिलेने बाजूला जाने पसंत केले. मात्र, तरुणाने पाठलाग करून त्या महिलेला जोराचा धक्का मारला यावरून महिलेचा राग अनावर झाला व महिलेने पायातील चप्पल काढत त्या मजनुस चांगला चोप दिला.

हा प्रकार पाहून नागरिकांनी त्या तरुणास पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, महिलेने तक्रार देण्यास नकार दिल्याने शेवटी पोलिसांनी त्या तरुणास सोडून दिले. हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details