औरंगाबाद- विभक्त राहत असल्याच्या नैराश्यातून एका महिलेने स्वतःला जाळून घेतल्याची घटना घडली होती. या महिलेचा घाटी रुग्णालयात गुरुवारी (६ जुन) उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिता भीमसिंग मेहर (वय २७, रा. एन-६ मथुरानगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
विभक्त राहत असल्याच्या नैराश्यातून महिलेने घेतले जाळून - domestic violance
अनिता या घरगुती वादामुळे पतीपासून मागील अनेक महिन्यांपासून विभक्त राहत होत्या. नैराश्यातुन कर्णपुरा येथील मैदानावर जाऊन त्यांनी स्वतःला जाळून घेतले होते.
अनिता या घरगुती वादामुळे पतीपासून मागील अनेक महिन्यांपासून विभक्त राहत होत्या. केटरिंगचे काम करून त्या स्वत:चा उदरनिर्वाह करीत होत्या. २ जून रोजी अनिता कर्णपुरा येथील नातेवाईकांच्या घरी आल्या होत्या. संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास नैराश्यातुन कर्णपुरा येथील मैदानावर जाऊन त्यांनी स्वतःला जाळून घेतले होते.
घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती छावणी पोलीस ठाण्याचे सहह्याक फौजदार बी.टी. वाघ यांनी दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.