औरंगाबाद - महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळवल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. शिवाजीनगर आणि शास्त्रीनगर या भागात ही घटना घडली. हे चोर ईराणी गँगशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले - mangalsutr
शिवाजीनगर भागांमध्ये राहणाऱ्या शैलजा अक्कर आणि शास्त्रीनगर भागात राहणाऱया सुनिता गायकवाड या दोन महिला घराजवळ असताना, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले.
जवाहरनगर पोलीस ठाणे
शिवाजीनगर भागांमध्ये राहणाऱ्या शैलजा अक्कर आणि शास्त्रीनगर भागात राहणाऱया सुनिता गायकवाड या दोन महिला घराजवळ असताना, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले. दोन्ही घटना दुपारच्या वेळेस घडल्या. दोन्ही घटनांमध्ये केवळ एका तासाचे अंतर होते. दोन्ही चोऱ्यांमध्ये वापरण्यात आलेली दुचाकी ही काळ्या रंगाची होती. याप्रकरणी पुंडलिक नगर व जवाहर नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.