महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन चिमुकल्यांना तिसऱ्या मजल्यावरून फेकून आईचा आत्महत्येचा प्रयत्न, मुलाचा मृत्यू - औरंगाबाद क्राइम बातमी

जन्मदात्या आईने आपल्या एका वर्षाच्या मुलासह मुलीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देत पाठोपाठ उडी घेतली. तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने डोक्याला गंभीर मार लागून मुलाचा मृत्यू झाला तर मुलगी व आई गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 3, 2021, 8:19 PM IST

औरंगाबाद- जन्मदात्या आईने आपल्या एका वर्षाच्या मुलासह मुलीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देत पाठोपाठ उडी घेतली. तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने डोक्याला गंभीर मार लागून मुलाचा मृत्यू झाला तर मुलगी व आई गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (दि. 3 मे) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

छत्रपतीनगर परिसरातील घटना

एका खासगी कंपनीत काम करणारे सतीष आतकर हे पत्नी अनिता, एक वर्षाचा मुलगा सोहम आणि दोन वर्षाची मुलगी प्रतीक्षासह एका भाड्याच्या खोलीत राहतात. मुळ बीड जिल्ह्यातील हे कुटुंब कामानिमित्त बजाजनगर परिसरातीलल छत्रपतीनगरात असलेल्या जिजामाता हौसिंग सोसायटीत राहण्यासाठी आले होते. नेहमीप्रमाणे सतीष हा कामानिमित्त सकाळी बाहेर पडला होता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आनिता हिने अचनाक एक वर्षाच्या सोहमला गच्चीवरून खाली फेकले. त्यानंतर मुलगी प्रतीक्षाला ढकलून दिल्यानंतर स्वतः देखील उडी मारली. यामध्ये सोहम डोक्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी प्रतीक्षा आणि आई आनिता दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद प्रक्रिया सुरू होती. अनिताने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

हेही वाचा -लसींचा तुटवड्यात तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ, 45 वर्षांवरील लगरिकांचे लसीकरण ठप्प

ABOUT THE AUTHOR

...view details