औरंगाबाद - पैठणमध्ये औषध विक्रेत्या पाठोपाठ एक महिला डॉक्टर देखील पॉझिटिव्ह आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे. गुरुवार (१६जुलै) रोजी बसस्थानक परिसरातील प्रसिद्ध खासगी रुग्णालयाची एक महिला डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण रुग्णालय सील करण्यात आले आहे. सध्या रुग्णालय परिसरात निर्जंतुकिकरणासाठी फवारणी करण्यात आली आहे. तसेच बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. यातील ११ जणांचे अँटीजेन रॅपिड टेस्टच्या माध्यमातून स्वॅब घेण्यात आले असून त्यांतील १० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एकजण पॉझिटिव्ह आहे.
पैठणमध्ये औषध विक्रेत्या पाठोपाठ महिला डॉक्टर पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ८१ वर - lockdown in paithan
पैठणमध्ये औषध विक्रेत्या पाठोपाठ एक महिला डॉक्टर देखील पॉझिटिव्ह आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे. गुरुवार (१६जुलै) रोजी बसस्थानक परिसरातील प्रसिद्ध खासगी रुग्णालयाची एक महिला डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण रुग्णालय सील करण्यात आले आहे.
त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८१ वर पोहोचली आहे. दरम्यान, जनता लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी पैठणमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नेहरू चौकात अचानक आरोग्य तपासणी करणाऱ्या पथकास भेट देऊन त्याची माहिती घेतली.
नगरपरिषदे मार्फत शहराच्या सर्व अकरा प्रभागांत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरात सात दिवस लॉकडाऊनच्या काळात जवळपास ५५ हजार नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली. तसेच नगरपरिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणीला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी केले आहे.