महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पैठण तालुक्यात महिलेची पेटवून घेत आत्महत्या - crime

जिल्ह्यातील आवडे उंचेगाव (ता.पैठण ) येथील 32 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना काल (शनिवार) रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.

पोलीस ठाणे, पाचोड

By

Published : Oct 13, 2019, 8:24 PM IST

औरंगाबाद- जिल्ह्यातील आवडे उंचेगाव (ता.पैठण ) येथील 32 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना काल (शनिवार) रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.


मंनाबाई शेंडगे, असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ती पती आणि सवतीपासून विभक्त राहत होती. अचानक तीने पेटवून घेत आत्महत्या केली असून अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहीती तीच्या पती शिवाजी शेंडगे यांनी पोलिसांना दिली आहे. याबाबत पाचोड (ता. पैठण) पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड आणि आप्पासाहेब माळी हे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details