महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पतीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महिला समुदाय अधिकाऱ्यास मारहाण - औरंगाबाद गुन्हे वृत्त

पतीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पत्नीने चक्क महिला समुदाय आरोग्य अधिकाऱ्यास मारहाण केल्याची घटना तिडी येथे घडली आहे. या प्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

woman-beats-female-community-officer
woman-beats-female-community-officer

By

Published : Jun 18, 2021, 10:22 PM IST

वैजापूर (औरंगाबाद) - पतीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पत्नीने चक्क महिला समुदाय आरोग्य अधिकाऱ्यास मारहाण केल्याची घटना तिडी येथे घडली आहे. या प्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक्षा सुनील अमोलिक असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या श्रीरामपूर तालुक्यातील शिवराई येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हिराबाई नारायण कोढाळे असे मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

१७ जून रोजी प्रतीक्षा आणि आशा सेविका विमल डुकरे या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या तिडी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात तपासणी करीत होत्या. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गावातीलच हिराबाई नारायण कोढाळे ग्रामपंचायत कार्यालयात आली. यावेळी संरपच सुदाम आहेर यांनी कोरोना तपासणी करायची आहे का, अशी विचारणा केली.
प्रतिक्षा अमोलिक या तपासणी किट काढू लागल्या. मात्र काही समजण्याच्या आतच हिराबाई हिने प्रतीक्षा यांची गच्ची धरून त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करीत त्यांचे केस ओढले. तू १५ दिवसांपूर्वी माझ्या नवर्‍याचा खोटा पॉझिटिव्ह रिपोर्ट काढला होतास असा आरोप त्यांनी यावेळी केला.

आम्ही आरटीपीसीआर चाचणी केली त्यावेळी ती निगेटिव्ह आली. तुझ्यामुळे लोक मरतील, असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. याशिवाय तू तपासणी कशी करते? असा दमही भरला. यावेळी आशा सेविका विमल डुकरे यांनी हिराबाई हिला प्रतीक्षा यांच्यापासून दूर करत वाद सोडवला. हिराबाई यांच्या पतीची २८ मे रोजी तिडी येथे कोरोना चाचणी करून घेतली होती. आणि त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. असे या प्रकरणी आरोग्य अधिकारी प्रतिक्षा अमोलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात हिराबाई कोढाळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details