औरंगाबाद -एका 36 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील नगिनापिंपळगाव येथे घडली आहे. याप्रकरणी, शहरातील शिवसेना कार्यकर्ता रावसाहेब मोटे याच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद : नगिनापिंपळगावात महिलेचा विनयभंग; शिवसेना कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल - महिलेचा विनयभंग शिवसेना कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल
नगिनापिंपळगाव येथील एका ३६ वर्षीय महिलेकडे बचत गटाचे काही हफ्ते थकले होते. त्यामुळे ते हफ्ते का भरले नाही, अशी विचारणा करण्यासाठी सोमवारी रात्री ८ वाजता मोटे महिलेच्या घरी गेला. सदरील महिला पाणी आणण्यासाठी घरात गेली असता मोटे याने तिचा विनयभंग केला.

हेही वाचा -चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग
रावसाहेब मोटे तालुक्यातील किरतपूर येथे राहतो. या परिसरातील काही महिला बचत गट चालवतात. बचत गटातील सदस्य असलेल्या नगिनापिंपळगाव येथील एका ३६ वर्षीय महिलेकडे काही हफ्ते थकले होते. त्यामुळे ते हफ्ते का भरले नाही, अशी विचारणा करण्यासाठी सोमवारी रात्री ८ वाजता मोटे महिलेच्या घरी गेला. सदरील महिला पाणी आणण्यासाठी घरात गेली असता मोटे याने तिचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर मोटे याने तिथून धूम ठोकली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.