औरंगाबाद -पतीला भाडोत्री गुंडांकडून मारहाण करत विभक्त राहणाऱ्या पत्नीने पतीच्या घरातून मुलाला पळवले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून, विशेष म्हणजे यात मुंबई येथील एका पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
अखेर औरंगाबादमधल्या 'त्या' व्हायरल व्हिडिओचे सत्य आले समोर, वाचून व्हाल थक्क... - wife beaten
पतीला भाडोत्री गुंडांकडून मारहाण करत विभक्त राहणाऱ्या पत्नीने पतीच्या घरातून मुलाला पळवले आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
औरंगाबाद येथे व्यवसायाने वकील असलेले श्रीकांत वीर आणि त्यांची पत्नी सोनाली वीर या मुंबई येथे वकिली करत आहेत. काही काळापासून दोघेही विभक्त राहतात. त्यांना १० वर्षाचा आर्या व ६ वर्षीचा रमण अशी दोन पदे आहेत. रमण औरंगाबादेत वडिलांकडे राहतो तर आर्या मुंबईत आईकडे राहते. रमणच्या ताब्यावरून दोघात औरंगाबाद न्यायालयात वाद सुरू आहे.
बुधवारी सोनाली यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी मुंबई येथे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अमोल चव्हाण, भाऊ कृष्णा लाटकर, नातलग शामाई मालोदकर यांच्यासह ६ ते ७ जण औरंगाबादमधील वीर यांच्या विद्यानगर येथील घरी रमणला भेटायला आले. मात्र, त्यानंतर दोघात कडाक्याचे भांडण झाले. सोनाली यांच्यासोबत मुंबईहून आलेल्या ६ ते ७ जणांनी वीर व त्यांच्या नातलगांना रस्त्यावर बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर श्रीकांत वीर यांच्या तक्रारीवरून पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल चव्हाण, सोनाली यांचा भाऊ कृष्णा लाटकर, शामाई मालोडकर यांना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड यांनी दिली.