औरंगाबाद- अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालादरम्यान व्हाट्सअॅप ग्रुप्सवर कोणतेही आक्षेपार्ह मजकूर पसरवले जाऊ नये, यासाठी अनेक ग्रुप ऍडमिनने खबरदारी म्हणून ग्रुपवर फक्त ऍडमिनच काही संदेश टाकू शकतात अशी सेटिंग करण्यात आल्याचे दिसून आले आहे. या निर्णयाने व्हाट्सअॅपच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅप अॅडमिन सावध - अयोध्या निकाल
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालादरम्यान व्हाट्सअॅप ग्रुप्सवर कोणतेही आक्षेपार्ह मजकूर पसरवले जाऊ नये, यासाठी अनेक ग्रुप ऍडमिनने खबरदारी म्हणून ग्रुपवर फक्त ऍडमिनच काही संदेश टाकू शकतात अशी सेटिंग करण्यात आल्याचे दिसून आले आहे. या निर्णयाने व्हाट्सअॅपच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर व्हाट्सअॅप आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा दोन जातीत तेढ निर्माण होतील, असे मजकूर न टाकण्यासाठी ताकीद देण्यात आली होती. जर कोणी असे मजकूर टाकले तर मजकूर टाकणाऱ्यासह ग्रुप ऍडमिनवर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना शिक्षा होईल, अशा सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. अनेक व्हाट्सअॅप ग्रुप ऍडमिनने आज खबरदारी म्हणून मजकूर टाकण्याचे अधिकार स्वतःकडे ठेवलाचे दिसून आले.
अयोध्या निकालाच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आयुक्तांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी महत्वाच्या बैठकी घेतल्या. या बैठकीत विशेषतः सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. सोशल मीडियाचा वापर कोणत्याही चुकीच्या बाबतीत होऊ नये विशेषतः वादस्पद वक्तव्य आणि मजकूर पसरवल्यास एक ते तीन वर्षांनी शिक्षा होऊ शकते, अशी तंबी पोलिसांनी दिली. त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह मजकूर टाकण्याचा प्रयत्न केला तर अडचण होऊ नये, याकरिता बहुतांश ग्रुप ऍडमिनने आपल्या ग्रुपमध्ये रात्री सेंटिंग बदलून फक्त ऍडमिनच मजकूर टाकू शकतील, असे बदल केले. जर कोणी काही मजकूर टाकला तर तो मजकूर ऍडमिनकडे जाईल आणि ऍडमिनला जर त्यात काही आक्षेपार्ह वाटले नाही, तर तो मजकूर ग्रुपमध्ये टाकला जाईल, अशी खबरदारी घेण्यात आल्याचे औरंगाबादसह अनेक जिल्ह्यात दिसून आले.