महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dhantrayodashi : दोन दिवसीय धनत्रयोदशीच्या योगामुळे होऊ शकतो 'या' राशींवर धनवर्षाव

यंदाची दिवाळी विशेष मानली जाते. कारण महत्त्वाची मानली जाणारी धनत्रयोदशी यंदा दोन दिवस (two days Dhantrayodashi) असणार आहे. काही भागांमध्ये 22 तर काही भागांमध्ये 23 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करता येणार आहे. 178 वर्षांनी असा अद्भुत योग आलेला आहे आणि त्याचा कोणत्या राशींवर काय परिणाम होतो, अशी माहिती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी दिली. What should people of which zodiac signs buy . Dhantrayodashi .

Dhantrayodashi
धनत्रयोदशी

By

Published : Oct 22, 2022, 1:12 PM IST

औरंगाबाद :यंदाची दिवाळी विशेष मानली जाते. कारण महत्त्वाची मानली जाणारी धनत्रयोदशी यंदा दोन दिवस असणार आहे. काही भागांमध्ये 22 तर काही भागांमध्ये 23 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करता येणार आहे. 178 वर्षांनी असा अद्भुत योग आलेला आहे आणि त्याचा कोणत्या राशींवर काय परिणाम होतो, अशी माहिती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी दिली. What should people of which zodiac signs buy . Dhantrayodashi .

प्रतिक्रिया देतांना ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी


मुहूर्त काळ : धनत्रयोदशी व प्रदोष खुला दिनांक 22 अक्टोबर 2022 रोजी शनिवारी द्वादशी समाप्ति 18:03 वाजता असून, प्रदोषकाळात त्रयोदशी असल्याने पंचांगात मुंबईच्या सूर्यास्तानुसार दि . 22 अक्टोबर रोजी धनत्रयोदशी व शनिप्रदोष दिलेला आहे . सायंकाळी 6:03 नंतर सूर्यास्त होत असलेल्या ठीकाणी 22 अक्टोबर रोजी धनत्रयोदशी व प्रदोष आहे. मात्र 23 अक्टोबर 2022 रोजी रविवारी त्रयोदशी समाप्ति 18.04 असून सायंकाळी 6.04 पूर्वी ज्या ठिकाणी सूर्यास्त होईल, त्या ठिकाणी त्रयोदशी संपूर्ण दिवसभर, संपूर्ण सायंकाळी आणि थोडावेळ तरी प्रदोष काळात मिळत असल्याने 6.04 पूर्वी सूर्यास्त असलेल्या ठिकाणी 23 अक्टोबर रोजी धनत्रयोदशी व प्रदोष आहे, अशी माहिती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी दिली.


दोन दिवसीय धनतेरस :22 अक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली कांही प्रमुख ठिकाणे संपूर्ण गुजरात, कर्नाटकातील बेळगांव, शिरसी, उडपी मंगळूर हे आहेत. तर, 23 अक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली कांही प्रमुख ठिकाणे सोलापूर, नागपूरसह, अकोला, अमरावती, अहमदनगर, इंदापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगांव , जालना, धुळे, नांदेड, परभणी, भुसावळ, यवतमाळ, लातूर, वर्धा, कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बिदर, अथ हुबळी, धारवाड, बेंगळूर, म्हैसूर संपूर्ण तेलंगणा, आंध्र प्रदेश मध्यप्रदेश, जैसलमेर सोडून संपूर्ण राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश हरियाणा, पंजाब या प्रदेशात सण साजरा होईल.



कुठल्या राशीला काय आहे लाभदायक : वेदमूर्ती ज्योतिषाचार्य, वास्तुतज्ञ अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे, धनत्रयोदशी निमित्य आज जाणुन घेऊया, कुठल्या राशीच्या लोकांनी काय खरेदी केल्यास लाभदायक ठरेल.

मेष - चांदी आणि तांब्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू. वृषभ -चांदीच्या वस्तू, तांदूळ, कपडे, सौंदर्य उत्पादने, परफ्यूम, दूध आणि त्याचे पदार्थ. मिथुन - स्टीलची भांडी, वाहने, सोने. कर्क - चांदीच्या वस्तू, स्टीलची भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू. सिंह - तांबे किंवा कांस्य वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू. कन्या - तांब्यापासून बनवलेला गणेश, स्वयंपाकघरातील कोणतीही वस्तू, कांस्य. तूळ -इलेक्ट्रॉनिक वस्तू, चांदी किंवा स्टीलची कोणतीही वस्तू, सौंदर्य उत्पादने किंवा घराच्या सजावटीची कोणतीही वस्तू. वृश्चिक - सोन्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू. धनु - सोन्याच्या वस्तू, तृणधान्ये, दागिने, रत्न, तृणधान्ये, चांदी आणि सौंदर्य उत्पादने. मकर - इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, स्टील आणि सौंदर्य उत्पादने. कुंभ - लोखंड, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, पोलाद वस्तू, श्रीगणेश आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांच्या मूर्तीसह सोन्याचे नाणे. मीन - सोने किंवा चांदीचे दागिने, चांदीची भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू. खरेदी कराव्यात. What should people of which zodiac signs buy . Dhantrayodashi .

ABOUT THE AUTHOR

...view details