महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजिंठा लेणी पर्यटकांसाठी खुली.. मास्क देऊन पर्यटकांचे स्वागत - अजिंठा लेणी औरंगाबाद लेटेस्ट न्यूज

अजिंठा लेणी परिसरातील व्यावसायिकांचे गेल्या वर्षभरापासून व्यवसाय बंद असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, पुन्हा व्यवसाय सुरू झाल्याने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अजिंठा लेणी पर्यटकांसाठी खुली
अजिंठा लेणी पर्यटकांसाठी खुली

By

Published : Jun 18, 2021, 9:38 AM IST

Updated : Jun 18, 2021, 12:40 PM IST

औरंगाबाद- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळ बंद केली होती. आता प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळ उघडले आहेत. पहिल्या दिवशी अजिंठा लेणीत 87 पर्यटकांनी दिली भेट दिली असून या पर्यटकांचे मास्क देऊन स्वागत करण्यात आले.

अजिंठा लेणी पर्यटकांसाठी खुली


६७ दिवसांपासून बंद
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जगप्रसिद्ध अजिंठा लेणी खुली करताच पहिल्याच दिवशी ८७ पर्यटकांनी भेट दिली आहे. या पर्यटकांंचेे येथील व्यावसायिकांनी मास्क पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. महिन्यांपासून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटकांसाठी बंद केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने १७ जुनपासून पर्यटकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. ही लेणी ६७ दिवसांपासून बंद होती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने येणाऱ्या पर्यटकांना टी पाॅईंटवर सॅनिटाईज केले जात हाेते. तर लेणीत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना मास्क लावणे व सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या सूचना दिल्या जात हाेत्या. तर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या वतीने सध्या एक बस पर्यटकांना ठेवण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांना दिलासा
अजिंठा लेणी परिसरातील व्यावसायिकांचे गेल्या वर्षभरापासून व्यवसाय बंद असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, पुन्हा व्यवसाय सुरू झाल्याने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Last Updated : Jun 18, 2021, 12:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details