औंगाबाद - वंचित सोबत आमची बोलणी सुरू असून आम्ही स्वतःच शंभर ऐवजी 80 जागा मागितल्या आहेत. जागा वाटप करताना आम्ही अडून बसणार नाही. मात्र 2014 च्या निवडणुकीत लढवलेल्या जागांसाठी आम्ही आग्रही आहोत, अशी माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वंचित सोबत जागावाटप बाबत अडून बसणार नाही - इम्तियाज जलील - प्रकाश आंबेडकर
जागा वाटप करताना वंचित सोबत आम्ही अडून बसणार नाही. मात्र 2014 च्या निवडणुकीत लढवलेल्या जागांसाठी आम्ही आग्रही आहोत, अशी माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ट्रिपल तलाक आणि कलम 370 च्या मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी विरोध करायला हवा होता. मात्र, ते गायब झाले. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीवर कोणाचा विश्वास राहिला नाही, असा टोलादेखील जलील यांनी लागावला. राष्ट्रवादिचे नेते भाजपनंतर आता वंचितमध्ये प्रवेश करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 'मुस्लिम मत मौलवींच्या सांगण्यावर पडतात' असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता. त्याविषयी बोलताना, आंबेडकरांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे मत जलील यांनी व्यक्त केले.