महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठवाड्यात यंदा पाण्याचा सुकाळ; प्रमुख धरणांचा पाणीसाठा सध्या 14 टक्के - मराठवाडा धरण पाणीसाठा

रविवारी जाहीर झालेल्या पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार या भागातील नऊ धरणांमधील पाणीसाठा 5,493.92 एमसीएम (दशलक्ष घनमीटर) आहे. जो त्यांच्या एकूण साठवण क्षमतेच्या 98.98 टक्के आहे. मागील वर्षी या प्रकल्पांमध्ये 84.03 टक्के पाणीसाठा होता

औरंगाबाद
औरंगाबाद

By

Published : Nov 8, 2020, 4:46 PM IST

औरंगाबाद- मराठवाडा भागातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा सध्या 14 टक्के इतका असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो अधिक आहे. पाटबंधारे विभागाला यावर्षी बागायती जमीन आणि महसुलात वाढ होण्याची अपेक्षा आहे, कारण जलाशयांमध्ये चांगला पाणीसाठा आहे, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे.

रविवारी जाहीर झालेल्या पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार या भागातील नऊ धरणांमधील पाणीसाठा 5,493.92 एमसीएम (दशलक्ष घनमीटर) आहे. जो त्यांच्या एकूण साठवण क्षमतेच्या 98.98 टक्के आहे. मागील वर्षी या प्रकल्पांमध्ये 84.03 टक्के पाणीसाठा होता, असे अहवालात म्हटले आहे. सध्या जायकवाडी धरणात (औरंगाबाद) शंभर टक्के पाणीसाठा आहे. माजलगाव धरण (बीड), येलदरी (हिंगोली), निमना माण (नांदेड) आणि निमना दुधना (परभणी) तसेच सिद्धेश्वर धरणात (हिंगोली) 99.08 टक्के साठा आहे. त्याखालोखाल निमना तेरणा (उस्मानाबाद)- 98.46 टक्के आणि सिना कोळेगाव (उस्मानाबाद) मध्ये 95.39 टक्के पाणीसाठा आहे, असे अहवालात म्हटले आहे.

महसूल आणि सिंचनाखालील जमीन क्षेत्रात वाढ होणार

गेल्या वर्षी या दिवसात मांजरा आणि सिना-कोळेगाव धरणात पाणीसाठाच नव्हता. तर निमना तेरणा येथे 35.07 टक्के, सिद्धेश्वर 22.91 टक्के आणि निमन दुधना 11.63 टक्के पाणीसाठा होता, असे या अहवालात म्हटले आहे.

अलीकडे, लातूर शहरासाठी पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या बीड-आधारित मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले गेले आणि पावसाने ओढ दिल्याने पाणी सोडण्यात आले. जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या भागातील अनेक जलाशय जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यावर्षी सिंचनाखालील जमीन क्षेत्रात वाढ होण्याची तसेच त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 27 कोटी रुपये महसूल वसूल झाला होता, यंदा ही रक्कम 30 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

यंदा ऊस लागवडीत वाढ होऊ शकते

औरंगाबादमधील जलसंधारण तज्ज्ञ प्रदीप पुरंदरे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे यंदा ऊस लागवडीत वाढ होऊ शकते. तथापि, कालव्यांमधील पाण्याचे नुकसान झाल्यामुळे धरणांमधून सोडण्यात आलेला साठा सिंचनासाठी आवश्यक असलेल्या भूभागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी आहे, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details