महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमधील जलसाठ्यात १५ टक्क्याने वाढ; जायकवाडी धरणात ५२ टक्के पाणीसाठा - aurangabad water level News

मराठवाड्यासाठी वरदान ठरलेला नाथसागर प्रकल्प २०१९ मध्ये तुडुंब भरला होता. नाशिक व नगर परिक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गेल्यावर्षी नाथसागरातून १५ ऑगस्ट रोजी दुपारी पाणी सोडण्यात आले होते. मात्र यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरणाची पाणी पातळी ५२ % च्या जवळपास गेली आहे.

water level increase in paithan dam in aurangabad
water level increase in paithan dam in aurangabad

By

Published : Aug 2, 2020, 2:54 PM IST

औरंगाबाद -धरण निर्मितीपासून पहिल्यांदाच नाथसागराच्या पाणलोट क्षेत्रात २ जूनला धरणाची पाणी पातळी ३८.११ टक्के होती. त्यानंतर पाण्याचा उपसा वाढल्यामुळे १७ जूनपर्यंत पाणी पातळी ३६ टक्क्यांवर पोहोचली. मात्र, १७ जून ते १ ऑगस्टपर्यंत जायकवाडी पाणलोट क्षेत्रात विक्रमी ५२९ मिमी पाऊस झाल्याने यंदा नाथसागराच्या पाणी पातळीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

औरंगाबादमधील जलसाठ्यात वाढ

सध्या नाथसागर धरणाची पाणी पातळी ५२.७३ टक्क्यांवर पोहचली आहे. विशेष म्हणजे नाथसागर धरणाच्यावरील बाजूस असलेल्या नाशिक व नगर जिल्ह्यात आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे नाथसागर ५० टक्के भरले आहे. मराठवाड्यातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी ही समाधानकारक बाब असल्याचे बोलले जात आहे.

मराठवाड्यासाठी वरदान ठरलेला नाथसागर प्रकल्प २०१९मध्ये तुडुंब भरला होता. नाशिक व नगर परिक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गेल्यावर्षी नाथसागरातून १५ ऑगस्ट रोजी दुपारी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच धरणाची पाणी पातळी ५२ टक्क्यांच्या जवळपास गेली आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरणाची पाणी पातळी १ हजार ५१२ पूर्णांक ९ फुटवर पोहचली आहे. सध्या धरणात १५ हजार ६०२ क्युसेक नवीन पाण्याची आवक सुरू आहे. धरणात १ हजार १४४.९०४ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच तारखेला धरणाची पाणी पातळी फक्त २.९६ टक्के नोंदवली गेली होती.

आपत्कालीन यंत्रणा सज्ज -
जायकवाडी धरणाचा मागील इतिहास पाहता पाटबंधारे विभागाने आपत्कालीन स्थितीमध्ये सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. धरणाच्या सर्व दरवाज्यांची तांत्रिक तपासणी करण्यात आली असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती धरण अभियंता संदीप राठोड, कनिष्ठ अभियंता बुद्धभूषण दाभाडे, धरण नियंत्रण कक्षाचे बी. वि. बोधणे यांनी दिली.

जायकवाडी धरणाची आज सकाळी ६ वाजताची स्थिती -
१) जायकवाडी धरणाची पाणी पातळी - १ हजार ५१२.०९ फुट
२)जायकवाडी पाणी पातळी मीटरमध्ये - ४६०.८८६ मीटर
३) पाण्याची आवक - १५ हजार ६०२ क्युसेक
४) एकूण पाणीसाठा - १ हजार ८८३.१० दलघमी
५)जिवंत पाणी साठा - १ हजार १४४.९०४ दलघमी
६) धरणाची टक्केवारी - ५२.७३%
७) उजवा कालवा विसर्ग - निरंक
८) पैठण जलविद्युत केंद्र - निरंक

ABOUT THE AUTHOR

...view details