महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : मतदानाला सुरुवात; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला - औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक न्यूज

आज (२१ मार्च) औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत बिगरशेती मतदारसंघातील पाच जागा निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे.

District Central Co-operative Bank Election
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक

By

Published : Mar 21, 2021, 11:14 AM IST

औरंगाबाद - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज (रविवारी) मतदान होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी चार वाजेपर्यंत मतदान करता येईल. यावर्षी शेतकरी विकास पॅनल आणि शेतकरी सहकारी बँक विकास पॅनल यांच्यात थेट लढत होत आहे. यामुळे जिल्ह्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला -

२१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत दोन जागा बिनविरोध तर वैयक्तिकसाठी एकही अर्ज न आल्याने १८ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होत आहे. यासाठी एकूण १ हजार ११४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीच्या रिंगणात ४८ उमेदवार आहेत. यामध्ये मंत्री, आमदार यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. औरंगाबाद तालुका सोसायटी मतदारसंघात जावेद पटेल आणि अंकुश शेळके, सोयगाव तालुक्यात रंगनाथ काळे आणि सुरेखा काळे, सिल्लोड मतदारसंघात अर्जुन गाढे आणि विष्णू जांभूळकर, फुलंब्री मतदारसंघात सुहास शिरसाट आणि पुंडलिक जंगले, कन्नड मतदारसंघात अशोक मगर आणि मनोज राठोड यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.

५० ते ६० मते घेणारे उमेदवार विजयी होण्याची शक्यता -

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या २१ मार्चला तर, २२ मार्चला मतमोजणी होणार आहे. २२ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. बिगरशेती मतदारसंघात विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, अभिजित देशमुख यांचा सामना जगन्नाथ काळे, रवींद्र काळे, रंगनाथ काेलते, जे.के.जाधव आणि दिलीप बनकर यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात पाच जागा आणि ३३५ मतदार असल्याने किमान ५० ते ६० मते घेणारे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज आहे

कोरोना बाधित मतदारांसाठी शेवटचा अर्धा तास -

कोरोना बाधित व संशयित रूग्णांना दुपारी साडेतीन ते चार या अर्धातासात मतदान करावे लागणार आहे. मतदान करताना पीपीई किट, फेसशिल्ड आदी उपाययोजनांचा अवलंब करावा लागेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी सांगितले. औरंगाबाद शहरात दोन, तर उर्वरित तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्येकी एक, अशी दहा मतदान केंद्रे आहेत.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details