कन्नड- (औरंगाबाद) - कन्नड तालुक्यातील टाकळी ते जवळी ह्या पाच किलोमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, या रस्त्यावरुन शेतकऱ्याना चिखलातून पायपीट करत जावे लागत आसल्याने तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी शेतकऱ्यानी केली आहे.
या रस्त्यावरुन टाकळी येथील दीडशे ते दोनशे शेतकऱ्याना दररोज शेतात शेती कामाकरता जावे लागते. मात्र, रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असल्याने ट्रॅक्टर, बैलगाडी तसेच मोटरसायकल सुध्दा नेता येत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. याच रोडवर दोन किमी तिसवड वस्ती असून पन्नास च्या जवळपास लोकांची वस्ती आहे त्याना या रस्त्याशिवाय पर्याय नाही.
टाकळी हे गाव शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या भिंतीच्या बाजूला वसलेले गांव असून या परिसरात ऊस उत्पादक व प्रगतशील शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी पाऊस ही चांगल्या प्रमाणात झाला असून केवळ रस्त्याअभावी शेतकऱ्याना तसेच वस्ती वरील लोकांची मोठी गैरसोय झालेली आहे.
सदर रस्त्याचीप मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत समाविष्ट करून दुरुस्त करण्यात यावा, नसता तीव्र आंदोलन छेडन्याचा ईशारा माजी सरपंच आबासाहेब आहेर, भगवान बारगळ, सुदाम आहेर, गणेश आहेर, विशाल आहेर, मुश्ताक शेख, बाळूदादा सातदिवे, पोपट आहेर, नानासाहेब सातदिवे, ज्ञानेश्वर आहेर, संजय बारगळ,आदींनी दिला आहे.