महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामविकास अधिकारी आत्महत्या प्रकरण, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Aurangabad Latest News

पैठण तालुक्यातील बिडकीन येथे कार्यरत असलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी निदर्शनास आली होती. या प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यासह चार जणांवर बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामविकास अधिकारी आत्महत्या प्रकरण, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ग्रामविकास अधिकारी आत्महत्या प्रकरण, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By

Published : Jan 22, 2021, 5:15 PM IST

औरंगाबाद -पैठण तालुक्यातील बिडकीन येथे कार्यरत असलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी निदर्शनास आली होती. या प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यासह चार जणांवर बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

संजय शिंदे असं आत्महत्या केलेल्या ग्राम विकास अधिकाऱ्याचं नाव आहे. संजय शिंदे यांच्याकडे गटविकास अधिकाऱ्याने पाच लाखांची मागणी केली होती. त्यावर शिंदे यांनी एक लाख रुपये देऊ केले होते, मात्र पाच लाखांच्या खाली एक रुपयाही घेणार नाही, 19 तारखेपर्यंत पैसे मिळाले नाही तर बडतर्फ करू अशी धमकी संजय शिंदे यांना गटविकास अधिकाऱ्याने दिली होती. या जाचाला कंटाळून संजय शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नी प्रतिभा शिंदे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

चार जणांवर गुन्हा दाखल

संजय शिंदे यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा शिंदे यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, गटविकास अधिकारी विजय लोंढे, विस्ताराधिकारी भास्कर साळवे, ग्रामसेवक सखाराम दिवटे आणि तुळशीराम पोद्दार या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक चौकशी वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

शिंदे यांच्या पत्नीने केले अधिकाऱ्यांवर आरोप

संजय शिंदे यांच्या पत्नी प्रतिभा शिंदे यांनी बिडकीन पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी 16 जानेवारी रोजी सायंकाळी संजय शिंदे घरी आले, तेव्हा ते तणावाखाली होते. त्यांना विचारणा केली असता गटविकास अधिकारी लोंढे यांनी कार्यालयात येऊन पाच लाखांची मागणी केली आहे. पैसे दिले नाही तर ते मला बडतर्फ करतील अशी धमकी त्यांनी दिली आहे, अस शिंदे यांनी सांगितलं. सोमवारी मतमोजणी करून शिंदे घरी आले त्यावेळेस, ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष सखाराम दिवटेआणि तुळशीराम पोद्दार हे दोघेही त्यांच्यासोबत आले होते. संजय शिंदे यांनी कपाटातून 70 हजार रुपये आणण्यास सांगितले आणि त्यांच्या जवळील तीस हजार असे एकूण एक लाख रुपये त्यांनी माझ्यासमोरच त्या दोघांना दिले. मात्र त्या दोघांनी पाच लाखाच्या खाली एक रुपयाही साहेब घेणार नाहीत असं सांगत पैसे न घेता तिथून निघून गेले. त्यानंतर संजय शिंदे रात्री घरी होते त्यावेळेस ते प्रचंड तणावाखाली होते, आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असा आरोप त्यांची पत्ती प्रतिभा शिंदे यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details