औरंगाबाद -विजयादशमीच्या मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे मंगळवारी पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानात शस्त्रांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती होती.
औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात दसऱ्यानिमीत्त विधिवत शस्त्रपूजन हेही वाचा - उमेदवारी मागे घ्या; समरजितराजेंच्या आईंना धमकीचे फोन
औरंगाबाद जिल्हा पोलीस दलात दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी विधीवत पूजा करून पोलीस दलात संरक्षणासाठी वापरले जाणारे विविध शस्त्रांचे पूजन करण्यात येते. ही परंपरा आजही अबाधित आहे औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी विधीवत पूजा करत शस्त्रपूजन केले. यावेळी पोलीस उपायुक्त मीना मकवाना सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर नागनाथ कोडे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत सह मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती. तर औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी मुख्यालयाच्या मैदानात शस्त्रागारातील शस्त्रांची पूजा केली.
हेही वाचा - भारतीय वायुसेना दिवस :लढाऊ विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांसह पार पडला विशेष कार्यक्रम...