सिल्लोड -राज्यातील वाढता करोना लक्षात घेऊन राज्य सरकारने लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्या अंतर्गंत राज्यातील आठवडी बाजार बंद करण्याचा आदेश दिल्याने सिल्लोड तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत.
लाॅकडाऊनमुळे बाजारपेठा बंद, सिल्लोड तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात
अनेक शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात आणि ते विक्री करण्यासाठी आपले हक्काचे व्यासपीठ म्हणुन शनिवारचा भराडी, रविवारचा सिल्लोडच्या आठवडी बाजारात घेऊन जातात. मात्र, प्रशासनाने आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या आदेशामुळे पुन्हा एकदा भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असुन पुन्हा भाजीपाला शेतात फेकुन देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
अनेक शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात आणि ते विक्री करण्यासाठी आपले हक्काचे व्यासपीठ म्हणुन शनिवारचा भराडी, रविवारचा सिल्लोडच्या आठवडी बाजारात घेऊन जातात. मात्र, प्रशासनाने आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या आदेशामुळे पुन्हा एकदा भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असुन पुन्हा भाजीपाला शेतात फेकुन देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वांगे, टमाटे, शेंगा, कोथिंबीर, मेथी पालक व इतर भाजीपाला पीक तोडणी अभावी शेतातच खराब होत आहे. सिल्लोड परिसरातील मोठे बाजार शनिवार-रविवारला येत असल्याने शेतकरी वर्ग पुन्हा अडचणीत सापडले आहे. बाजार बंदच्या निर्णयावर भाजीपाला उत्पादक शेतकरी पांडुरंग कुदळ यांनी ई टीव्ही भारतला आपली प्रतिक्रिया दिली आहे.