पुणे :औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकराने परवानगी दिली आहे. मात्र या निर्णयाविरोधात एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या या उपोषणाच्या स्थळी औरंगजेबचे फोटो झळकवण्यात आले. यावर आत्ता विरोध होत आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना विचारला असता ते म्हणाले की औरंगजेब या मातीतले नाहीत का? त्यांचा जन्म मोगल सलतनतमध्येच झाला ना, फोटो लावले म्हणून मला काही नवीन वाटत नाही, असे यावेळी आंबेडकर म्हणाले.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?:वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, औरंगजेब हा या मातीचा नाही का? त्यांचा जन्म मोगल सलतनत मध्ये झाला आहे ना? उपोषणात फोटो असणे, यात नवीन काही नाही. ज्यांना हिंदू मुस्लिम डिवाईड करायचे आहे, त्यांनी करावे. आज आपण पाहिले तर धार्मिक राजकारण जे देशात केले जाते आहे. त्याच प्रमाण हा वाढला आहे, असे देखील यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पोटनिवडणूकीच्या निकालावर प्रतिक्रिया:कसबा तसेच चिंचवड पोटनिवडणूकीत जो निकाल लागला आहे. त्याबाबत तसेच चिंचवडमध्ये वंचितने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पडला आहे, असे म्हटल जात आहे. यावर आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार नसता तर राहुल कलाटे आले असते. मी यावर जास्त बोलत नाही. दोन्ही ठिकाणी सरकारच्या विरोधातील हा निर्णय आहे. सरकारच्य नाकर्त्या कामामुळे हे जनमत आहे, असे देखील यावेळी आंबेडकर म्हणाले. तसेच भाजपला कसबामध्ये मते कमी झालेली दिसत नाही. रविंद्र धंगेकरांनी चांगली बांधणी केली म्हणून त्यांना अधिक मत मिळाली. मला असे वाटते की हा विजय रवींद्र धंगेकर यांचा आहे, असे देखील यावेळी आंबेडकर म्हणाले.