औरंगाबाद - कोरोना काळात उपचार घेणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमधून चक्क साहित्य चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरात सुरू करण्यात आलेल्या 18 पेक्षा अधिक सेंटरमधून या वस्तूंची चोरी झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाची मनपा आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे.
मनपाने दिल्या दर्जेदार सुविधा..
कोरोना झालेल्या रुग्णांना 14 दिवस क्वारंटाईन करावे लागते. त्यासाठी रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळाव्या यासाठी महानगरपालिकेने आपल्या मालकीच्या इमारतींमध्ये, तर काही ठिकाणी खाजगी इमारतींमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करत आरोग्य सेवा दिली. ही सेवा देत असताना रुग्णांसाठी काही वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या. ज्यामध्ये गादी, उशी, बकेट, पिलो कव्हर, बेडशीट, माईक सिस्टीम, रेडिओ, टीव्ही, फ्रिज, ऑक्सिमीटर, थर्मल गन असे कोट्यवधींचे साहित्य उपलब्ध करून दिले होते. मात्र, सेंटर बंद केल्यावर यातील बरेच साहित्य पालिकेकडे जमा झाले नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा -घरफोड्या रोखण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडून जुन्याच यंत्रणेचा वापर