छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Vande Bharat Express Hit Cow : जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची गायीला धडक लागल्यानं इंजिन बंद पडल्याची घटना लासूर ते पोटुळ रेल्वे स्टेशन दरम्यान शनिवारी (13 जानेवारी) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. तसंच जवळपास एक तास रेल्वे इंजिन दुरुस्त करण्यासाठी लागले. मागील दहा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वंदे भारत छत्रपती संभाजीनगरमध्ये बंद पडल्याची घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वी प्रवाशानं चालू गाडीत सिगारेट ओढल्यानं अलार्म वाजल गाडी बंद झाली होती. त्यामुळं बराच वेळ धावपळ उडाली होती.
गाय धडकेत गाडी झाली बंद :नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ झाला. शनिवारी नियमित वेळेत रेल्वे संभाजीनगरकडे येत असताना लासूर ते पोटुळ रेल्वे स्टेशन दरम्यान अचानक गायमध्ये आल्यानं जोराची धडक बसली. या घटनेत रेल्वेचे ब्रेक पाईपसह इंजिनचे इतर नुकसान झाले. त्यामुळं रेल्वे रस्त्यात बंद पडली, इंजिन बंद पडल्यानं रेल्वे सुरू होण्यासाठी बराच काळ प्रयत्न करावा लागला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी आपल्या टीमला चालकाच्या मदतीसाठी पाठवले. त्यानंतर जवळपास एक तासानं इंजिन सुरू झालं. त्यानंतर रेल्वेचं इंजिन सुरू झाले. ही रेल्वे रात्री आठच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर स्थानकावर पोहोचली.