वैजापूर -ज्या वेळी समाजावर संकट येते, त्या त्यावेळी लोककलावंत प्रबोधनाच्या माध्यमातून संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतात. आज कोरोना नावाचे संकट देशासमोर आहे आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग लसीकरण हाच आहे. त्यामुळेच लोककलावंतांनी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी लसीकरणाबाबतचे गैरसमज लोकगीताच्या माध्यमातून दूर केले आहेत.
लोकगीताच्या माध्यमातून लस घेण्याचे आवाहन
'घ्या करून लसीकरण, लावा कोरोनाला पळवून..' हे गीत म्हणणारे आहेत औरंगाबादच्या वैजापूर येथील लोककलावंत योगेश चिकटगावकर. सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. लोकांना रुग्णालयात बेडही मिळत नाहीत. सर्वसामान्य लोकांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी लोककलावंत पुढे सरसावले आहेत. ते लोकगीताच्या माध्यमातून लस घेण्याचे आवाहन करत आहेत.