पैठण तालुक्यात गारांचा पाऊस - news about Unseasonal rain
पैठण तालुक्यात गारांचा पाऊस पडला. यामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाला आहे.
पैठण (औरंगाबाद) - तालुक्याच्या काही भागात आज सायंकाळी अचानक गारांचा पाऊस झाल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्या गारांच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजा प्रमाणे येत्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्रच्या काही भागात पावसाची शक्याता हवामान खात्याने वर्तवली होती.
आज पैठण तालुक्याच्या काही भागात अचानक पणे गारांचा पाऊस झाल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाला आहे. शेतात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाले आहेत. तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज होता. मात्र, गारा पडल्याने मोसंबी सारख्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतात उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.