औरंगाबाद : येथे बार्टी आणि सारथी संस्थेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मागील 6 महिन्यांपासून आर्थिक लाभ मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडला आहे. विद्यापीठातील प्रवेश असणाऱ्या या विद्यार्थ्यांना पालक या नात्याने कुलगुरुंंनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून मानधन मिळून देण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी युवा सेनेचे शहर सचिव अक्षय खेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य इमारतीसमोर समांतर अंतर ठेवून आंदोलन करण्यात आले.
औरंगाबाद : बार्टी आणि सारथी शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठात आंदोलन - सारथी शिष्यवृत्ती बातमी
बार्टी आणि सारथी संस्थेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मागील 6 महिन्यांपासून आर्थिक लाभ मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विद्यापीठातील प्रवेश असणाऱ्या या विद्यार्थ्यांना पालक या नात्याने कुलगुरुंंनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून मानधन मिळून देण्यासाठी प्रयत्न करावा, यासाठी युवा सेनेचे शहर सचिव अक्षय खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज समांतर अंतर ठेवून आंदोलन करण्यात आले.
बार्टी व सारथी संस्थेमध्ये विद्यापीठातील जवळपास एक हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत. या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सामान्य कुटुंबातील गरजवंत विद्यार्थी आज ना उद्या मानधन मिळेल, या आशेवर शांत बसला होता. मात्र, राज्य पूर्वपातळीवर आल्यानंतर सुद्धा सारथी आणि बार्टी शिष्यवृत्तीधारकांना पैसे मिळालेले नाही. विद्यार्थ्यांना पालक या नात्याने कुलगुरुंनी पुढाकार घेऊन शिष्यवृत्तीधारकांना न्याय द्यावा, यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी अक्षय खेडकर, अमोल कर्डीले, अजय पवार, कृष्णा पाटील, अमोल धनदरे, प्रमोद तांबे, अक्षय ताठे, बाबुराव धनवंडे यांच्यासोबत 30 विद्यार्थी आंदोलनात सहभागी होते.