केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानात केले प्रवाशावर उपचार, जीव वाचला
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानात एका प्रवाशावर उपचार केला. मंगळवारी इंडिगोच्या विमानात हे घडलं. विमानामध्ये एका प्रवाशाला रक्तदाब आणि चक्कर आल्याने तो कोसळला. त्यानंतर तत्काळ त्या व्यक्तीजवळ जाऊन कराड यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. रुग्णास वेळेवर प्राथमिक उपचार मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला.
औरंगाबाद - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानात एका प्रवाशाला जीवदान दिल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांनी एकावर मंगळवारी विमानातच उपचार केले. विमानामध्ये एका प्रवाशाला रक्तदाब आणि चक्कर आल्याने तो कोसळला. त्यानंतर कराड यांनी तत्काळ त्या व्यक्तीजवळ जाऊन तातडीने प्राथमिक उपचार केले. रुग्णास वेळेवर प्राथमिक उपचार मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला.
केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड इंडिगो फ्लाइट क्रमांक 171 ने दिल्ली ते मुंबई विमान प्रवास करीत होते. विमानामध्ये असलेल्या व्यक्तीस अचानक रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. तो प्रवासी चक्कर येऊन पडला. ही बाब प्रसिद्ध बालरोग तज्ञ असलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ विमानामध्ये रुग्णाजवळ जाऊन तपासणी केली आणि प्रथमोपचार केले. केंद्रीय मंत्री स्वतः उपचार करीत असल्याने डॉ. भागवत कराड यांचे कौतुक उपस्थितांनी केले.