औरंगाबाद -परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पहाणीसाठी ( Check the loss of farmers ) माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) आज औरंगाबाद दौऱ्यावर ( Uddhav Thackeray visit Aurangabad ) आहेत. त्यांनी आज नुकसाग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, पंचनामे नंतर करा मात्र, आधी दुष्काळ जाहीर करून मदत करा, शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत हवी आहे. तीच मागणी आम्ही देखील करत आहोत अस शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
हेक्टरी पन्नास हजारांची मदत करा -शहरात किती पाऊस पाडवा हे पालिकेच्या हातात नसतं अस म्हणणारे मुख्यमंत्री शेतात किती पाऊस पाडवा हे आमच्या हातात नाही अस म्हणू शकतात. अशी टीका उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आपत्ती आपल्या हातात नसते. मात्र या परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू देऊ नये हे सरकारचे काम आहे. सरकार मधले कोणीही मंत्री आले नाही. हे उत्सव वादी सरकार आहे. फक्त उत्सव करण्याचं काम करते. उत्सव साजरे करा हरकत नाही. मात्र परिस्थितीत काय ते पहा, प्रतीकात्मक भेट देण्यासाठी आलो. ५० हजार हेक्टरी शेतकऱ्यांची मागणी आहे तीच मागणी आम्ही करू, पंचनामे होतील तेव्हा होतील, आधी दुष्काळ जाहीर करा अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली.
आत्महत्येचा मार्ग अवलंबु नका - ज्यांना स्वतःच घर सोडलं त्याला शेतकऱ्याच घर काय दिसणार, माझ्याशी गद्दारी केली किमान शेतकऱ्यांशी गद्दारी करू नका. ऐन दिवाळीत सरकारकडे वेळ नाही मात्र शिवसेना सोबत आहे. महा विकास आघाडी देखील तुमच्या सोबत आहेत. फक्त एक विनंती आहे. आत्महत्येचा मार्ग अवलंब करू नका. आसूड तुम्हीच उगरा, फोटो काढण्यासाठी आमच्या हाती देऊ नका, सरकारला पाझर नसेल फुटत तर घाम फोडा. असा घणाघात उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला.