औरंगाबाद- अंघोळीसाठी तलावात उतरलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना खुलताबादच्या तलावात शुक्रवारी दुपारी घडली. विलास भगवान किर्तीकर (वय 22) आणि अजिम अहमद शेख (वय 34, दोघे रा. कसाबखेडा), अशी त्यांची नावे असल्याची पोलिसांनी दिली.
खुलताबादमध्ये तलावात बुडून २ तरुणांचा मृत्यू, परिसरात हळहळ - औरंगाबाद
खुलताबादच्या तलावात शुक्रवारी दुपारी घडली. विलास आणि अजिम हे दोघे पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही तलावात बुडाले. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
विलास आणि अजीम हे दोघेही आज खुलताबाद येथे कामानिमित्त आले होते. काम आटोपून घरी जाताना रस्त्यामधील तलावात पोहण्याचा मोह दोघांनाही आवरला नाही. त्यामुळे दोघांनीही आंघोळ करण्याचा बेत आखला. दोघेही पाण्यात उतरले, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करीत दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकाच गावातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.