कन्नड (औरंगाबाद) - तालुक्यातील देवळाणा येथील ग्रामीण भागात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पॉझिटिव्ह रुग्णामध्ये आई आणि दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.
कन्नड तालुक्यातील देवळाणात सापडले दोन कोरोनाबाधित, औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव - कन्नड तालुक्यात आढळले कोरोनाबाधित
औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कन्नड तालुक्यातील देवळाणा गावात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहे. एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा रुग्णालयाच्यावतीने शनिवारी सायंकाळी स्वॅब घेण्यात आला होता. त्यातील दोन व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पॉझिटिव्ह रुग्णामध्ये आई व दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. पहिल्यांदाच कोरोनाचे रुग्ण आढळल्याने कन्नड तालुक्यात खळबळ माजली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयातील कोरोना विशेष कक्षात उपचार सुरू आहे. तर दोन निगेटिव्ह रुग्णांना कुंजखेडा येथील रुग्णालयात अलगीकरन कक्षात दाखल करणार असून दोन दिवसांनी पुन्हा त्यांचा स्वॅब घेऊन तपासणी करणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी सांगितले.
रुग्णांच्या प्रवासाचा व भेटीगाठींच्या इतिहासाची माहिती प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहेत. या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारणटाईन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.