औरंगाबाद जिल्ह्यात दोघांची आत्महत्या; कारण अस्पष्ट - औद्योगिक क्षेत्र
या दोन्ही आत्महत्येप्रकरणी संबंधित सातारा आणि वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
औरंगाबाद - तीस वर्षीय खासगी बस चालकाने औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱया घटनेत वाळूज औद्योगिक क्षेत्रातील जोगेश्वरी भागात एका 20 वर्षीय तरुणीने गळफास घेतल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या दोन्ही आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याने पोलीस पुढील तपास करत आहेत.
समाधान वळूबा जाधव वय 30 वर्ष(रा.आमेरनगर) असे खासगी चालकाचे नाव आहे तर माया नागुराव चव्हाण वय-20 (रा.जोगेश्वरी, औरंगाबाद) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. या दोन्ही आत्महत्येप्रकरणी संबंधित सातारा आणि वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.