औरंगाबाद -जिल्ह्यातील वडोदबाजार येथील दोन शाळकरी मुलांचा ओढ्यात पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. यानतंर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. तमजिल मोबिन शेख (वय-14) व मिनाज आनिस शेख (वय-13 दोन्ही रा.वडोदबाजार) अशी मृतांची नावे आहेत.
ओढ्याच्या पाण्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू, वडोदबाजार येथील घटना - drowning
औरंगाबाद जिल्ह्यातील वडोदबाजार येथील शौचास गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा ओढ्यात पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तमजिल मोबिन शेख (वय-14) व मिनाज आनिस शेख (वय-13 दोन्ही रा.वडोदबाजार) अशी मृतांची नावे आहेत.

तमजील आणि मिनाज हे दोघेही श्री सरस्वती भवन हायस्कुलमध्ये सातवीच्या वर्गात शिकत होते. गुरुवारी दुपारी दोघेही त्यांचे दप्तर वर्गातच ठेवून जवळील ओढ्याच्या बाजूला शौचास गेले होते. त्यावेळी ओढ्यावर गेल्यानंतर त्यांचा पाय घसरल्याने ते दोघेही पाण्यात पडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोघेही बराच वेळ शाळेत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता, ओढ्याच्या काठी त्यांची चप्पल आढळली. त्यावरून शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह ओढ्यात आढळले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. या दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.