औरंगाबाद -कन्नड तालुक्यातील बनशेद्रा येथील 2 शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. शुभम सुभाष वाहुळ, अक्षय महिंद्रा त्रिभुवन असे या दोन मुलांची नाव आहेत. हे दोघंही पोहण्यासाठी तलावात उतरले होते. 20 सप्टेंबरच्या दुपार पासून शुभम वाहुळ, अक्षय त्रिभुवन दोघंही बेपत्ता होते. 21 सप्टेंबरला सकाळी दोघांचा मृतदेह गावातील तलावात आढळून आला. या घटनेने बनशेंद्रा गावात शोककळा पसरली आहे.
कन्नड तालुक्यातील बनशेद्रामध्ये तलावात बुडून दोघांचा मृत्यू - औरंगाबादमध्ये दोघांचा तलावात बडून मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बनशेद्रा येथील २ शाळकरी मुलांचा तलावात बडून मृत्यू झाल. हे दोघेही २० सप्टेंबरला दुपारी बेपत्ता होते.
अधिक माहिती अशी की, शाळकरी मूल त्यांची नावे शुभम सुभाष वाहुळ, अक्षय महिंद्रा त्रिभुवन दिनांक 20 सप्टेंबरला दुपारी पोहण्यासाठी गेली होती. रात्री खुप उशीराही दोघे घरी न आल्याने त्यांचे कुटुंब चिंतेत पडले होते. सर्वत्र शोध घेतला तरी दोघे कुठेही सापडले नाहीत. कुटुंबातील सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी रात्रभर शोधकार्य केले. सकाळी तलावाकडे शोधण्यासाठी गेले असता, तलावाचा बाजूला त्यांचे कपडे दिसले. तलावात पाहिले असता, दोघाचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले, तेव्हा आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे पूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.