औरंगाबाद - येथील हर्सूल कारागृहाच्या दोन अधिकाऱ्यांसह बारा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी कारागृहातील 60 अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये ही लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. लागण झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारागृहाच्या बाहेरील विश्रामगृहात उपचार सुरू करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून कारागृह पूर्णतः बंद असताना अशा प्रकारे लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
हर्सूल कारागृहातील 2 अधिकाऱ्यांसह 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - harsul jail aurangabad news
औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील 2 अधिकारी आणि 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाधितांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आले असून कारागृहातील विश्रामगृहात त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती अधीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली आहे.
औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात आतापर्यंत 30 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या सर्व कैद्यांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. कारागृहातील कैद्यांना बाधा झाल्याचं समोर आल्यावर तिथे कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मंगळवारी 60 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील 14 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आले आहे. ज्यामध्ये दोन अधीकारी आणि बारा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बाधित अधिकारी कर्मचाऱ्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आले असून कारागृहातील विश्रामगृहात त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती अधीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली आहे.
कारागृहात असलेल्या इतर कैद्यांचीदेखील तपासणी करण्यात येत आहे. कारागृहात आणण्यात येणारा भाजीपाला आणि येणारे धान्य यामार्फत कोरोनाची बाधा आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, राज्यातील कारागृह दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असताना औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.