औरंगाबाद: घाटी परिसरात रस्त्यावर झोपलेल्या दोघांचा खून करण्यात आला, या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Two Killed On Footpath in aurangabad). खून झालेल्या एकाला त्यांचा मुलगा पाच वर्षापासून शोधत होता. पोलिसांनी मृताची ओळख पटवताना मुलाने ही माहिती दिली. वडील घर सोडून गेले होते. मागील पाच वर्षापासून ते कुठे आहेत हे देखील मुलाला माहीत नव्हतं. मात्र माहिती मिळाली त्यावेळेस वडील जगात नाहीत हे कळल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
रविवारी झाली हत्या:घाटी परिसरात शिवलिंगअप्पा घुसे आणि संग्राम जाधव या दोन इसमांचा खून झाला होता. त्या खुनाचा उलगडा झाला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला शिवलिंगप्पा भुसे यांची ओळख पटली होती. मात्र दुसरा मृतदेह कोणाचा याबाबत काहीच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे त्यांचा फोटो घेऊन पोलिसांनी शोध सुरू केला असता, मिळालेल्या माहितीनुसार संग्राम व्यंकटराव जाधव असं त्यांचं नाव निष्पन्न झाल.
पाच वर्षांनी लागला वडिलांचा शोध:संग्राम जाधव यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेत असताना, पोलिसांनी त्यांचा फोटो दाखवत शोध कार्य सुरू केलं. चौधरी कॉलनीत राहणाऱ्या रंगराव जाधव यांनी फोटो ओळखत हे आपले वडील असल्याचे सांगितलं. संग्राम जाधव हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील रहिवासी आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद मध्ये राहत होते. ते आपल्या मुलासोबत राहत नव्हते, अनेक वेळा ते घर सोडून निघून जायचे. त्यांना मुलगा शोधून परत आणायचा. मात्र पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर ते गेले ते सापडलेच नाहीत. त्यांचा शोध अनेक वेळा घेण्यात आला. मात्र त्यांचा कुठेच ठाव ठिकाणा लागला नाही अशी माहिती मुलगा रंगराव यांनी दिली.
वडील फुटपाथवर राहतात माहीत नव्हत:संग्राम जाधव यांची एकाने हत्या केली. किरकोळ कारणावरून ही हत्या झाली होती. त्यांच्या मुलाचा शोध लागला. त्यानंतर त्यांचं मृतदेह त्याच्या ताब्यात देण्यात आला. मात्र वडील घर सोडून गेल्यावर आपण त्यांना शोधलं मात्र ते सापडले नाही. ते फुटपात वर राहत होते याची कल्पना देखील आपल्याला नव्हती. काही किलोमीटर अंतरावर त्यांचा मुलगा रंगराव घरात राहत होता. आपले वडील अशा अवस्थेत राहत असून असल्याचे कळल्याने त्याला दुःख झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.