संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा शिवारात छोटाहत्ती टेम्पो व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाले ( Two died in accident at Sangamner ) आहे. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे.ओम राहूल पेंडभाजे ( वय वर्षै १९ ) शुभम सदाशिव टेकुडे ( वय वर्षै १८) दोघे राहणार देवगिरीवस्ती साकूर तालुका संगमनेर असे अपघातात ठार झालेल्या तरूणांची नावे आहेत.
Tempo And Bike Accident : ऐन दिवाळीत काळाचा घाला, टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू - reason of accident unclear
संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा शिवारात छोटाहत्ती टेम्पो व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाले ( Two died in accident at Sangamner ) आहे. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे.ओम राहूल पेंडभाजे ( वय वर्षै १९ ) शुभम सदाशिव टेकुडे ( वय वर्षै १८) दोघे राहणार देवगिरीवस्ती साकूर तालुका संगमनेर असे अपघातात ठार झालेल्या तरूणांची नावे आहेत.
![Tempo And Bike Accident : ऐन दिवाळीत काळाचा घाला, टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू Tempo And Bike Accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16755926-531-16755926-1666852995828.jpg)
नागरिकांची घटनास्थळी धाव :याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की बुधवारी दुपारी पिंपळगाव देपा शिवारात छोटाहत्ती टेम्पो हा साकूरकडे जात ( Tempo and bike collision ) होता. अमोल पेंडभाजे व शुभम सदाशिव टेकुडे हे दोघे तरूण दुचाकीवरून संगमनेरकडे जात असताना ही दोन्ही वाहने पिंपळगाव देपा शिवारात आली. असता त्याच वेळी या वाहनांचा अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीवरील दोघेजण ठार झाले आहे. अपघात झाल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
उपचाराअगोदरच दोघांचा मृत्यू :त्यानंतर दोघाही जखमींना रुग्णवाहिकेतून औषधोपचारासाठी संगमनेर येथे नेण्यात आले होते मात्र त्या अगोदरच दोघांचाही मृत्यू झाला होता.घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस.एस.सातपुते, प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे, संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या दोन्ही तरूणांच्या अपघाती मृत्यूने साकूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दिवाळीतच या दोघा तरूणांच्या अपघाती मृत्यूने पठारभागावर शोककळा पसरली आहे.