औरंगाबाद- पैठण रोडवरील कौडगावजवळ साखर कारखान्याला जाणारा डबल ट्रॉली उसाचा ट्रक्टर उलटला. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या चारचाकीला उलटलेल्या ट्रॉलीची धडक लागली. यात चारचाकीतील दोघे जखमी झाले आहेत.
औरंगाबाद : कौडगाव येथे अपघात, दोघे जखमी - पैठण
पैठण रोडवरील कौडगावजवळ साखर कारखान्याला जाणारा डबल ट्रॉली उसाचा ट्रक्टर उलटून तो चारचाकीला धडकला. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त वाहन
घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बनसोडे, तागंडे पाटील हे तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना जवळल्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला सरकवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला.
हेही वाचा - ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांचे नुकसान; हरभऱ्यावर अळीचा प्रादूर्भाव