महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Two Died in Road Accident : पाचोड पैठण महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू - पाचोड पैठण महामार्गावर अपघात

समोरुन जाणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक ब्रेक दाबल्याने दोन कारचा पाचोड-पैठण राज्यमहामार्गावरील लिंबगाव फाट्या जवळ अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला ( Two Died in Road Accident ) असून चार जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना बधुवारी (दि. 23 मार्च) मध्यरात्री घडली. अनिल बाबासाहेब कोरडे आणि दत्ता निवृत्ती तांगडे (दोघे रा. दावरवाडी, पैठण), असे अपघातात मृत झालेल्यांची नाव आहेत.

अपघातग्रस्त वाहन
अपघातग्रस्त वाहन

By

Published : Mar 24, 2022, 3:03 PM IST

औरंगाबाद- समोर जाणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक ब्रेक दाबल्याने दोन कारचा पाचोड-पैठण राज्यमहामार्गावरील लिंबगाव फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला ( Two Died in Road Accident ) असून चार जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना बुधवारी (दि. 23 मार्च) मध्यरात्री घडली. अनिल बाबासाहेब कोरडे आणि दत्ता निवृत्ती तांगडे (दोघे रा. दावरवाडी, पैठण), असे अपघातात मृत झालेल्यांची नाव आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पैठण येथील राहूल माळवदे व त्यांचा मुलगा साई माळवदे हे कारमधून पैठणकडे जात होते. मात्र, समोर जाणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून येणारी कारने समोरच्या कारला धडक दिली. कारमधील अनिल बाबासाहेब कोरडे, दत्ता निवृत्ती तांगडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. चार जण जखमी असून त्यापैकी लतिब तांबोळी, सोमिनाथ दहीभाते हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांसह पाचोड पोलिसांना दिली असता पाचोड पोलीस ठाण्यांचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी, विलास काकडे हे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. घुगे यांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले तर चौघांना प्राथमिक उपचार करून त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे. त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा -Bus Cyclist Accident On Gevrai Road : पैठणला वारीसाठी जाणाऱ्या सायकलस्वार भाविकाला बसने चिरडले

ABOUT THE AUTHOR

...view details