औरंगाबाद - जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या दावरवाडी येथे शनिवार रोजी दुपारी शेतकरी प्रकाश देशमुख यांच्या शेतामध्ये शेततळ्यातील पाणी पाहण्यासाठी गेलेला नातू यश विनोद शिंदे (वय ८) व लॉकडाऊन परिस्थितीमुळे आपल्या मामाच्या गावाला आलेला पुरुषोत्तम संतोष जाधव (वय २०) रा. नागेश्वरवाडी औरंगाबाद या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
दावरवाडी येथे शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू - 2 died by drowning
शनिवारी दुपारच्या सुमारास यश आणि संतोष हे दोघे शेततळ्यातील पाणी पाहत असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडल्याना त्यांचा बुडून मृत्यू झाला.
शनिवारी दुपारच्या सुमारास यश आणि संतोष हे दोघे शेततळ्यातील पाणी पाहत असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडल्याना त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही बातमी कळताच नातेवाईकांनी धाव घेत त्या दोघांना पाण्यातून बाहेर काढून पाचोड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहीत जैन यांनी तपासून मृत घोषीत केले. या घटनेमुळे दावरवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केल्या जात आहे. या घटनेचा पंचनामा बीट जमादार सुधाकर मोहिते यांनी केला असून पाचोड पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.