गंगापूर (औरंगाबाद) - गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीवर कायगाव पुलावरून बुधवारी रात्री साडेआठ च्या दरम्यान पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेत स्थानिक जीवरक्षक दल व पोलिसांच्या मदतीने महिलेला वाचवण्यात यश आले, मात्र पतीचा शोध लागला नव्हता. स्थानिक जलरक्षक अग्निशमन दलाच्या गुरुवारी संध्याकाळपर्यंत सुरू असलेल्या शर्तीच्या शोध मोहिमेतही महिलेचे पती भागवत वचिष्ट सावंत याचा शोध लागला नाही.
'त्या' दाम्पत्यापैकी पतीचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला पाण्यावर तरंगताना - औरंगाबाद गुन्हेवृत्त
गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीवर कायगाव पुलावरून बुधवारी रात्री साडेआठ च्या दरम्यान पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेत स्थानिक जीवरक्षक दल व पोलिसांच्या मदतीने महिलेला वाचवण्यात यश आले, मात्र पतीचा शोध लागला नव्हता. शुक्रवारी पतीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

तब्बल दोन दिवसांनी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला-
शुक्रवारी (22 जानेवारी) रोजी 11 वाजेच्या दरम्यान महिलेच्या पतीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. पाण्यात तरंगत असलेल्या मृतदेहाबाबत स्थानिकांनी याबाबत गंगापूर पोलिसांना कळवले असता गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी भिल्ल यांनी अविनाश जगधने, आबा फाजगे, बाळू बिरुटे, संतोष आढगळे, किरण फासगे यांच्या मदतीने पाण्याबाहेर काढुन उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले. उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.