औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात २ दिवसांचा बंद पुकारण्यात आला आहे. व्यापारी महासंघाने बंदचे आवाहन केल्यानंतर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बंदचे आदेश काढल्यानंतर जिल्ह्यात कडकडीत बंद पाळल्याचे पाहायला मिळाले.
कोरोना: औरंगाबादमध्ये २ दिवसांचा कडकडीत बंद - औरंगाबादमध्ये २ दिवसांचा कडकडीत बंद
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात २ दिवसांचा बंद पुकारण्यात आला आहे. व्यापारी महासंघाने बंदचे आवाहन केल्यानंतर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बंदचे आदेश काढल्यानंतर जिल्ह्यात कडकडीत बंद पाळल्याचे पाहायला मिळाले.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे संशयित वाढण्याचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री हे आदेश काढले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर तुरळक गर्दी मात्र दिसत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. शुक्रवारपर्यंत ५० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी जवळपास 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे ही दिलासा देणारी बाब मानली जात आहे. तर एक रुग्ण पॉसिटिव्ह असल्याने खबरदारी घेतली जात आहे. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने २ दिवस बंदची घोषणा केली होती. त्या बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी तुरळक व्यापार सुरू आहे. मात्र, सुरू असलेली दुकाने पोलीस प्रशासनाच्या माध्यामातून बंद केली जात होती. गरज नसल्यास रस्त्यावर पडू नका असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तरी बरेचसे नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत होते.