कन्नड (औरंगाबाद) - जिल्ह्यातील कन्नड शहरात कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आलेले दोन रुग्ण सापडत नसल्याची ( two corona patients missing in aurangabad ) धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रुग्णांना शोधण्याची मोहीम राबवण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर आली आहे.
चुकीचा मोबाईल नंबर दिल्याने झाला गोंधळ -
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. बुधवारी कन्नड शहरातील दोन नागरिकांनी चाचणी केल्यावर त्याचा अहवाल गुरुवार दि 13 जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आला. अहवाल आल्यावर बाधित रुग्णांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला जातो. मात्र या दोन नागरिकांनी त्यांच मोबाईल क्रमांक चुकीचा दिल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आता या रुग्णांना शोधावे कसे असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.