औरंगाबाद- पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. शुक्रवारी रात्री नक्षत्रवाडी भागात ही घटना घडली. प्रदीप भगवान काजळे (वय ९) आणि तुषार प्रकाश शिरसाठ, अशी मृत मुलांची नावे आहेत.
पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा खाणीत बुडून मृत्यू - pradip kajale
शुक्रवारी संध्याकाळी तुषार, प्रदीप आणि त्यांचे इतर दोन मित्र असे चौघे नक्षत्रवाडी भागातील खाणीकडे फिरायला गेले होते. तेथे गेल्यावर पोहायचा मोह न अवरल्याने तुषार आणि प्रदीपने पाण्यात उडी मारली. मात्र, दोघेही पाण्याच्यावर आलेच नाहीत.
शुक्रवारी संध्याकाळी तुषार, प्रदीप आणि त्यांचे इतर दोन मित्र असे चौघे नक्षत्रवाडी भागातील खाणीकडे फिरायला गेले होते. तेथे गेल्यावर पोहायचा मोह न अवरल्याने तुषार आणि प्रदीपने पाण्यात उडी मारली. मात्र, दोघेही पाण्याच्यावर आलेच नाहीत. यानंतर भेदरलेल्या दोन्ही मित्रांनी तेथून पळ काढला.
हे दोघेही घाबरले असल्याने गावात कोणालाही त्यांनी याविषयी काही सांगितले नाही. घरच्यांनी शोध घेतला असता तुषार आणि प्रदीप दोघेही पाण्यात बुडल्याचे लक्षात आले. यानंतर लगेचच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.