औरंगाबाद - औरंगाबाद-बीड हायवे रोड लगत असलेल्या गांधीली शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेडा परिसरातील नुरानी मस्जीदजवळ राहणारे अतिक अकील शेख (वय 19), नदीम नाशेर शेख (वय 17) हे दोघे पोहण्यासाठी बीड बायपास गांधीली शिवारात गेले. दोघांनी पोहण्यासाठी तलावात उडी मारली. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडाले.