औरंगाबाद - बीड बायपास रोडवर भरधाव ट्रकचा व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड बायपास रोडवरून पैठणकडे जात असताना सचिन कल्याण राठोड (वय ३२), नितेश पुंडलिक पवार (वय २५, दोघे रा.नाईक नगर, शिवाजीनगर) यांना सूर्या लॉन्ससमोर भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.