औरंगाबाद- औरंगाबादसह जालना जिल्ह्यातील मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरणाऱ्या २ उत्तर प्रदेशच्या चोरट्यांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून सव्वादोन लाखांच्या ३४ बॅटरी पोलिसांनी जप्त केली आहे. रिजवान शहनाजुद्दीन (वय २६ वर्षे), जलालूद्दीन बिरबल (वय २२ वर्षे, दोघे रा. मेरठ, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरणारी यूपीची जोडी जेरबंद; सव्वादोन लाखाच्या 34 बॅटरी जप्त - Sachin Jire
औरंगाबादसह जालना जिल्ह्यातील मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरणाऱ्या २ उत्तर प्रदेशच्या चोरट्यांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली.
आरोपींसह पोलीस पथक
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात असलेल्या मोबाईल टॉवरवर लावलेल्या महागड्या बॅटरी हे दोघे लंपास करायचे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रमानगर भागातील दोघांच्या घरावर छापा मारला असता घरात बॅटरीचा ढीग पोलिसांना दिसला. पोलिसांनी एकूण ३४ बॅटरी जप्त केल्या आहेत, अशी माहिती मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक उद्धव जाधव यांनी दिली आहे.