औरंगाबाद - गावठी कट्यासह तीन काडतुस, ५ वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्यांसह दोन जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने मिटमिटा येथे अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण हरिश्चंद्र गंगावणे (रा. अंसार कॉलनी, पडेगाव) आणि योगेश बाबूराव साबळे (२७, मिटमिटा), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. किरण गंगावणे हा प्लॉटिंग खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असल्याची माहिती खबऱ्याने राहुल रोडे यांना दिली. तेव्हापासून रोडे आणि त्यांचे सहकारी आरोपीच्या मागावर होते.
माहिती मिळताच आवळल्या मुसक्या -
कारतूस भरलेल्या पिस्तुलासह दोन जण अटकेत, विशेष पथकाची कारवाई - पिस्तुलासह दोघांना अटक
गावठी कट्यासह तीन काडतुस, ५ वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्यांसह दोन जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने मिटमिटा येथे अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Two arrested with a pistol
आरोपी गंगावणे सायंकाळी गावठी कट्ट्यासह घराबाहेर पडल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोडे, कर्मचारी सय्यद शकील, इमरान पठाण, मनोज विखणकर, विनोद पवार आणि आडे यांनी सापळा रचला. मिटमिटा येथील शाळेजवळ गंगावणे साथीदार साबळेसह येताना दिसताच पोलिसांनी त्यांना पकडले. त्याच्या कमरेला खोचलेले पिस्तूल पोलिसांनी हिसकावून घेतले. त्याच्याजवळ तीन जिवंत काडतुसे आणि वापरलेल्या बुलेटच्या पाच रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या. पोलिसांनी त्याला अटक केली.