महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शुल्लक कारणावरून तरुणाची हत्या, दोघांना अटक - Murder of a youth in Badnapur

मोसंबीच्या शेतात शेळ्या घुसल्याच्या शुल्लक कारणावरून, लोखंडी रॉड व दगडाने तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना बदनापूर तालुक्यातील काजळा शिवारात घडली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. संजय पुंजाराम मांगडे (35) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

शुल्लक कारणावरून तरुणाची हत्या
शुल्लक कारणावरून तरुणाची हत्या

By

Published : Mar 30, 2021, 7:25 PM IST

बदनापूर -मोसंबीच्या शेतात शेळ्या घुसल्याच्या शुल्लक कारणावरून, लोखंडी रॉड व दगडाने तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना बदनापूर तालुक्यातील काजळा शिवारात घडली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. संजय पुंजाराम मांगडे (35) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आरोपींना अटक

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बदनापूर तालुक्यातील काजळा शिवारात संजय पुंजाराम मांगडे, संदीप सुदाम गवारे व सोमनाथ तुकाराम जाधव हे शेळ्या चारत होते. या शेळ्या बाजूलाच असलेल्या विठठल अप्पा गरड यांच्या मोसंबीच्या शेतात घुसल्या. याचा राग आल्याने विठ्ठल गरड व बद्री उर्फ मन्नू विठ्ठल गरड या दोघांनी संजय, संदीप व सोमनाथ यांना शिव्या देण्यास सुरुवात केली, व त्यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला देखील केला. दरम्यान मारहाणीत लोखंडी रॉडचा जोरदार फटका डोक्यात लागल्याने संजय मांगडे हे खाली कोसळले, त्यानंतर आरोपीने त्यांच्या छातीवर दगडाने मारल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताचा भाऊ रमेश पुंजाराम मांगडे यांच्या तक्रारीवरून विठ्ठल गरड आणि बद्री उर्फ मन्नू गरड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -भाजपा उमेदवारानं प्रचारातून काढलं मोदींचं नाव; म्हणाला त्यांचं नाव घेतलं तर एकही मत मिळणार नाही

ABOUT THE AUTHOR

...view details