महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादच्या पैठणमध्ये तिहेरी हत्याकांड; एकाच कुटुंबातील चौघांवर अज्ञाताचा हल्ला - औरंगाबादेत तिहेरी हत्याकांड

जिल्ह्यात तिहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पैठण येथील जुने कावसन भागात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. तर, एक चिमुरडा जखमी आहे.

murder
हत्या

By

Published : Nov 28, 2020, 9:22 AM IST

Updated : Nov 28, 2020, 10:08 AM IST

औरंगाबाद- जिल्ह्यात तिहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पैठण येथील जुने कावसन भागात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. तर, एक चिमुरडा जखमी आहे.

एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

संभाजी निवारे, पत्नी अश्विनी संभाजी निवारे व मुलगी सायली संभाजी निवारे हे जागीच ठार झाले. जखमी मुलगा सोहमवर उपचार सुरू आहेत. या तिघांची हत्या कोणी केली, तसेच हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पहाटे घडली घटना

ही घटना आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास गावातील नागरिकांच्या पाहण्यात आल्यानंतर उघडकीस आली. घटनास्थळी पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भांबरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे दाखल झाले होते. पुढील तपास सुरू आहे.

हत्येचे कारण अजूनही अस्पष्ट

हत्या नेमकी कशामुळे झाली हे अजूनही अस्पष्ट आहे. पोलिस या बाबत अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेनंतर संपुर्ण गावात भितीचे वातावरण आहे. शिवाय हळहळही व्यक्त केली जात आहे.

Last Updated : Nov 28, 2020, 10:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details